आई - वडिलांचे छत्र हरवलेल्या ५ मुलांची स्वीकारली शैक्षणिक जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 03:39 PM2021-08-05T15:39:00+5:302021-08-05T15:39:10+5:30
बारामतीच्या सांगवीतील संभाजी ब्रिगेडचे विनोद जगताप यांचा पुढाकार
सांगवी : कोरोना महामारीत आई - वडिलांचे छत्र हरवलेल्या ५ अनाथ मुलांची शैक्षणिक जबाबदारी पणदरे येथील जगताप दाप्म्त्याने आपल्या खांद्यावर उचलली आहे. तर यावेळी पूरग्रस्तांना देखील मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंसह धनादेश स्वरूपात रक्कम देण्यात आली.
जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे तसेच सचिव पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे विनोद जगताप व मुख्याध्यापक स्वरांजली जगताप या दाप्म्त्याने ज्या मुलांचे पालक कोरोना महामारीमुळे मृत्यू झाले आहेत. अशा मुलांचे भिकोबा नगर येथे इयत्ता दहावी पर्यंत गणवेश,दप्तर,वह्या पुस्तके देऊन मोफत शिक्षण देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला होता.
कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणासाठी जगताप यांच्याकडे नातेवाईक संपर्क साधत होते. त्यानुसार मंगळवारी जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल भिकोबानगर पणदरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ५ मुलांचे मोफत प्रवेश देत त्यांना शालेय उपयोग वस्तूंचे वितरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण या ठिकाणी महापुरामुळे विस्कळीत झालेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिजाऊ इंग्लिश मिडीयम स्कूलने आव्हान केले होते. त्यानंतर पालक व ग्रामस्थांनी जीवनावश्यक वस्तूं व पाच हजार रूपयांचा धनादेश प्रशासनाडे सूपूर्त केला.