पालकत्व गमावलेल्या मुलांची स्वीकारली जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:40+5:302021-07-29T04:10:40+5:30
इंदापूर तालुक्यातही रुई गावातील कणसे कुटुंबातील आजोबा एकनाथ कणसे व वडील शिवाजी एकनाथ कणसे यांचे कोरोनामुळे निधन ...
इंदापूर तालुक्यातही रुई गावातील कणसे कुटुंबातील आजोबा एकनाथ कणसे व वडील शिवाजी एकनाथ कणसे यांचे कोरोनामुळे निधन झाले. या कुटुंबातील पुरुष म्हणून कुणीही उरलं नसून शिवाजी कणसे यांच्या मातोश्री, पत्नी व शर्वरी, तनिष्का, रचना व अवधूत अशी अपत्ये असून ते अनुक्रमे इयत्ता दहावी, नववी, सातवी व दुसरीमध्ये शिकत आहेत. दोन महिन्यांपूर्वी आपले वडील व आजोबा गमावलेल्या या लहानग्यांपुढे घरातील रोजच्या खर्चापासूनच स्वत:च्या शिक्षणाचाही खर्च निर्माण झाला होता. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी आपले सामाजिक बांधिलकी म्हणून या मुलांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला आहे. कणसे कुटुंबाचे झालेले नुकसानभरपाई कधीच होऊ शकत नाही; मात्र आपण सामाजिक बांधिलकी जाणून जे शक्य आहे, त्या गोष्टी तर नक्कीच करू शकतो. या मुलांचे शिक्षण महत्वाचे आहे. त्यामुळे आपण ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे माने यांनी जाहीर केले.