लाच स्वीकारताना पोलिसांना पकडले
By admin | Published: November 21, 2014 04:05 AM2014-11-21T04:05:10+5:302014-11-21T04:05:10+5:30
पंचवीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
पिंपरी : पंचवीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.
राजेंद्र बळीराम साळुंके (वय ५१), बाळू कांतीलाल भवर (वय २६) अशी त्या पोलिसांची नावे आहेत. यातील तक्रारदाराने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. ‘ही तक्रार खोटी असून खोटी तक्रार दाखल केली म्हणून तुझ्यावर कारवाई करतो’ अशी भीती पोलिसांनी तक्रारदाराला घातली. तसेच तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर साळुंकेने तक्रारदाराकडून गुरुवारी २५ हजारांची लाच स्वीकारली. ती रक्कम भवर याने पोलीस ठाण्याच्या तळमजल्यावरील कपाटाखाली लपवून ठेवली होती. पथकाने सापळा रचून दोघांनाही पकडले. (प्रतिनिधी)