काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 16:31 IST2024-09-29T16:30:48+5:302024-09-29T16:31:40+5:30
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने पाच कामगार गंभीर जखमी झाले होते

काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
पुणे : येवलेवाडी येथे दुपारी दिड वाजता एका काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने झालेल्या अपघातात दुर्देवाने चार कामगारांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येवलेवाडी येथे काच उतरवत असताना काचा असलेले बॉक्स अंगावर पडुन त्याखाली कामगार अडकले होते. क्रेनच्या साह्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर कामगारांना बाहेर काढून हॉस्पिटल मध्ये दाखल केले. त्यामधे 4 कामगारांचा मृत्यू झाला असून दोन जणांची जणांची प्रकृती गंभीर आहे. तर एक जखमी असल्याचे अग्निशमन दलाचे समीर शेख यांनी सांगितले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले. त्यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला असून इतर कामगारांना दवाखान्यात दाखल केले. घटना का व कशी घडली याचा तपास सुरू आहे. अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे.