मुंबई - पुणे महामार्गावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू तर दोघेजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 14:43 IST2021-05-25T14:41:23+5:302021-05-25T14:43:24+5:30
मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर कामशेत बोगदा येथे समोर चाललेल्या ट्रकला मागून येणाऱ्या कारची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला..

मुंबई - पुणे महामार्गावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू तर दोघेजण जखमी
कामशेत : मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर कामशेत बोगदा येथे समोर चाललेल्या ट्रकला मागून येणाऱ्या कारची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.तसेच या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अभिजित रामलिंग घवले ( डेप्युटी कमिशनर जीएसटी माजगाव मुंबई ) (वय ४५), शंकर गौडा यतनाल (वय ४५), असे अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नावे असून अभिजित घवले यांची पत्नी शिल्पा अभिजित घवले ( वय ४० ) व चालक पंडित खंडू पवार ( वय ३७ ) हे गंभीर जखमी झाले आहेत.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मंगळवारी (दि.२५) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंबई- पुणे लेनवर कामशेत बोगद्याजवळ ( किमी नं.७२ ) येथे समोर चाललेल्या ट्रकला (क्र. एम एच ४५ एफ ४७१९) मागुन येणाऱ्या इनोव्हा कारची (क्र. एम एच ०८ ऐ जी ३७३७) जोरदार धडक बसुन भीषण अपघात घडला. जखमींवर सोमाटणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग युनिटचे सतीश वाळुंजकर, सचिन जाधव, संजय राक्षे, संतोष वाळुंजकर यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच प्रमाणे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.