सिंहगड रस्त्यावरील नवले पुलाजवळ अपघात : एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 18:41 IST2018-08-01T18:40:38+5:302018-08-01T18:41:47+5:30
शहरातील सिंहगड रस्त्यावरील नवले पुलावर भीषण अपघात झाला असून या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

सिंहगड रस्त्यावरील नवले पुलाजवळ अपघात : एकाचा मृत्यू
पुणे : शहरातील सिंहगड रस्त्यावरील नवले पुलावर भीषण अपघात झाला असून या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी संध्याकाळी झालेल्या या दुर्घटनेतील मृताचे नाव मात्र अद्याप समजलेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास गोकुळ दुधाचा टँकर भरधाव वेगाने आला. या टँकरने मोटारसायकलसह इतर चार वाहनांना धडक दिली. या धडकेत सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले असून मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस पोचले असून अधिक तपास सुरु झाला आहे.
(अधिक माहिती थोड्याच वेळात)