पालखी मार्गावर भीषण अपघात; दाेघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:39 AM2018-06-24T11:39:26+5:302018-06-24T11:41:43+5:30
पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर नीरा-वाल्हा दरम्यान भीषण अपघात झाला अाहे. दोन चार चाकी वाहणे समोरा समोर धडकल्याने दाेघांचा मृत्यू झाला अाहे.
नीरा: पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर नीरा-वाल्हा दरम्यान भीषण अपघात झाला अाहे. दोन चार चाकी वाहणे समोरा समोर धडकल्याने दाेघांचा मृत्यू झाला अाहे. नीरा बाजुने इको व्हैन तर वाल्हे बाजुने हुंडाई कंपनीची अलिशान कार दोघांत जोरदार धडक झाली.
रविवारी पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या या अपघातात एक जागीच ठार झाला तर फलटण येथील डॉ सत्यम लोगाडा यांचा लोणंद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन गंभीर जखमी झाले असून इतर चार जखमींना जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका व्यक्तीला लोणंद येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात अाले अाहे. रविवारी पहाटे पाचच्या दरम्यान दोन्ही वाहने वेगात समोरासमोर धडकली. पुणे बाजुंकडून येणारी हुंडई कंपनीची आलीशान कार नंबर एम.एच.१२-जे.एम.८०२३ हीचा या अपघातात पुढिल भागाचा चुराडा झाला आहे. गाडीमध्ये एअर बॅग असल्याने पुढील बाजूला बसलेले गंभीर जखमी झाले नाही. मात्र मागील बाजूस बसलेले डॉ. सत्येन हुकुमचंद दोभाडा. (वय ४३ वर्ष राहणार मुळ फलटण हल्ली पुणे यांचा लोणंद) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लोणंद बाजने आलेल्या मारुती इको व्हॅन नंबर एम.एच. १२- एल.पी.६८३३ धडकल्याबरोर दोन लहान मुले गाडीबाहेर फेकली गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इको व्हॅनचा ड्रायव्हर आनंद गणपत चांडूली (वय ४० राहणार वेळापूर,ता.माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांचा पाय अडकल्याने ते जागीच ठार झाले. दरम्यान सकाळी जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.