पुणे - नाशिक महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात ; ११ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 05:06 PM2019-08-27T17:06:49+5:302019-08-27T17:11:17+5:30

धडकेमुळे एवढा मोठा आवाज झाला की आजूबाजूची नागरिक सैरावैरा पळत अपघातग्रस्त ठिकाणी आले.

Accident of passenger transport vehicle on pune- Nashik highway; 11 people were injured | पुणे - नाशिक महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात ; ११ जण जखमी 

पुणे - नाशिक महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात ; ११ जण जखमी 

Next

मंचर : पुणे- नाशिक महामार्गावर मंचर खानवस्तीजवळ तीन चाकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा आसनी ऑटो रिक्षागाडीला मालवाहतूक गाडीने मागील बाजूस जोरदार धडक दिल्याने एपे गाडीतील प्रवासी जखमी झाले आहेत. या धडकेमुळे एवढा मोठा आवाज झाला की आजूबाजूची नागरिक सैरावैरा पळत अपघातग्रस्त ठिकाणी आले. जखमींमध्ये सात महिला व तीन पुरुष असून ड्रायव्हरचा समावेश आहे. जखमींवर मंचर येथील पुणे जिल्हा ग्रामीण रुग्णालय व खासगी दवाखान्यात उपचार चालू असल्याची माहिती पोलीस नाईक राजेंद्र हिले यांनी दिली. मालवाहतूक चालक फरार झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती पुणे-नाशिक महामार्गावर ऑटो रिक्षा मंचरकडे जात असताना (एमएच- 12. एफसी 7540 ) या मालवाहू गाडीने धडक दिल्याने एपे रिक्षा (एमएच- 23. 4125) वीस फूट लांब जाऊन खड्ड्यात उडाली आहे, रिक्षातील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे विश्वास बाळू नाईक वय 42,रा. अवसरी खुर्द,सुवर्णा लहू शिंदे (वय ३५,रा. अवसरी खुर्द) ज्ञानेश्वर गावडे (वय ६२ रा .गावडेवाडी), दिपाली संदीप शिंदे (वय 33, अवसरी खुर्द), लक्ष्मण विठ्ठल आरने ( वय 45,रा. कोपरगाव)हरिचंद्र पोपट जाधव वय 40 रा. पारुंडे. ता. जुन्नर)सारिका चंद्रकांत शिंदे ,वय 34 राहणार अवसरी खुर्द, मीना श्याम शिंदे वय 30 रा. अवसरी खुर्द), जनाबाई थोरात (वय75 रा. खान वस्ती मंचर) , नंदा जानू जंगम (वय 60 रा. अवसरी खुर्द )या सर्व जखमींवर पुणे जिल्हा ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालय येथे उपचार चालू आहेत. ग्रामीण रुग्णालयात डॉ. अधिक्षिका चंदाराणी पाटील ,डॉ. गणेश पवार, डॉ. संपत केदारे हे उपचार चालू आहेत
अपघातग्रस्त ठिकाणी निलेश टेमकर, व अनेक प्रवाशांनी जखमींना उपचारासाठी मदत केली असून त्यांनी तात्काळ अ‍ॅम्बुलन्सला बोलून सर्व जखमींना रुग्णालयात हलवले. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील दिनेश खेडकर, माजी सभापती आनंद शिंदे ,कल्याण  शिंदे, पोलीस पाटील संतोष शिंदे यांनी भेट दिली पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र पोलीस कॉन्स्टेबल पुंडलिक मराडे अधिक तपास करत आहे

Web Title: Accident of passenger transport vehicle on pune- Nashik highway; 11 people were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.