सिंहगड रस्त्यावर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 12:08 PM2020-11-29T12:08:55+5:302020-11-29T12:09:14+5:30
बसच्या पाठीमागील चाकाखाली अडकून महाडिक यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
धायरी: पी एम पी एल बस व दुचाकीचा अपघात झाल्याने एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. जयंत रामजी महाडिक (वय ६७, रा. नांदेड CRगाव, पुणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. हि घटना सकाळी आठच्या सुमारास पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल चौकाजवळ घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वारगेट कडून नऱ्हे कडे निघालेली पी एम पी एल बस ( क्रमांक एम एच १२ एफ ओ २४४०) संतोष हॉल चौकाजवळील जगताप हॉस्पिटल समोर आली असता बसच्या पाठीमागील बाजूस दुचाकीचा धक्का लागून दुचाकीस्वाराला डोक्याला जोराचा मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींनी नसल्याने नेमका अपघात कसा झाला याबाबत सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करीत आहेत.मयत जयंत महाडिक हे खासगी संस्थेत सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असत. ते कामावरून घरी निघाले असताना सदर अपघात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेल्मेट नसल्याने मृत्यू?
बसच्या पाठीमागील चाकाखाली अडकून महाडिक यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हेल्मेट असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने लोकमत प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.