Accident: दुधाचे बिल देण्यासाठी निघालेल्या १७ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 04:17 PM2021-12-09T16:17:10+5:302021-12-09T17:19:38+5:30

रिक्षाने धडक दिल्याने डोक्याला मार लागून तरुण गंभीर जखमी झाला होता

Accidental death of a 17 year old youth who went out to pay his milk bill | Accident: दुधाचे बिल देण्यासाठी निघालेल्या १७ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

Accident: दुधाचे बिल देण्यासाठी निघालेल्या १७ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

Next

लोणी काळभोर : दुध डेअरीत बिल देण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या अल्पवयीन तरुणाला रिक्षाने धडक दिल्याने अपघातीमृत्यू झाल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.  यश जितेंद्र पवार ( वय १७, रा. पाषाणकर बाग,लोणी काळभोर ) असे अपघातातमृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा चुलत भाऊ विशाल प्रकाश पवार ( वय ३५, रा. विठ्ठल मंदिरासमोर, लोणी काळभोर ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दुचाकी घेऊन घरातून हिसार दुध डेअरी लोणी स्टेशन येथे बिल देण्यासाठी निघाला होता. तो कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पालखीस्थळ येथे पोहोचला. त्यावेळी लोणी स्टेशनकडून लोणी काळभोर गावाकडे भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाचालकाने दुचाकीस धडक दिली. त्यामध्ये यश याच्या डोक्यास मार लागून तो गंभीर जखमी झाला. मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचे वडील जितेंद्र छगन पवार यांनी तात्काळ विश्वराज रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे हे करत आहेत.  

Web Title: Accidental death of a 17 year old youth who went out to pay his milk bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.