पाणी-चाऱ्याच्या शोधात चिंकाराचे अपघाती मृत्युसत्र सुरूच
By admin | Published: April 1, 2016 03:28 AM2016-04-01T03:28:43+5:302016-04-01T03:28:43+5:30
चारा, पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांचा आधार घेणाऱ्या चिंकाराचे अपघाती मृत्युसत्र सुरूच आहे. त्यावर कायम उपाय योजना दुष्काळाच्या काळात झाली पाहिजे, अशी मागणी
बारामती/काऱ्हाटी : चारा, पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांचा आधार घेणाऱ्या चिंकाराचे अपघाती मृत्युसत्र सुरूच आहे. त्यावर कायम उपाय योजना दुष्काळाच्या काळात झाली पाहिजे, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे. आज बारामती-मोरगाव रस्त्यावर फोंडवाडा बसस्थानकाजवळ चिंकाराचा अपघाती मृत्यू झाला . या महिनाभरात ६ चिंकाराचे मृत्यू अपघाती झाले आहेत.
पाणी टंचाई, वनक्षेत्रात नैसर्गिक चारा उपलब्ध होत नसल्यामुळे वन्यप्राणी विशेषत: चिंकारा मानवी वस्त्यांकडे चारा, पाण्याच्या शोधात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी काऱ्हाटी पाटीजवळ चिंकाराचा अपघाती मृत्यू झाला होता. याच परिसरात या प्राण्यांचे अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. महिनाभरात सहा चिंकाराचे मृत्यू झाले. त्यात ५ अपघाती मृत्यू झाले आहे. एकाचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे.