पुणे महापालिकेचे कर संकलन अधिकारी सुनील कांबळे यांचे अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:17 AM2020-06-10T00:17:02+5:302020-06-10T00:18:10+5:30
रविवारी दुपारी धानोरी येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाला होता.
पुणे : पुणे महापालिका करसंकलन विभागाचे अधिकारी व पुणे महापालिका कामगार संघटनेचे नेते सुनील तात्यासाहेब कांबळे (वय ५६ रा.कमल पार्क, धानोरी) यांचे मंगळवारी उपचारादरम्यान निधन झाले. रविवारी दुपारी झालेल्या अपघातात जखमी झाले होते. उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
सुनील कांबळे यांचा रविवारी ७ जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धानोरी येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. पुणे महापालिकेच्या करसंकलन विभागात अधिकारी पदावर कार्यरत होते. महापालिका कामगार संघटनेचे ज्येष्ठ नेते होते. पुणे शहरातील विविध फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह महापालिका अधिकारी, कर्मचारी मित्र परिवार यांना मोठा धक्का बसला आहे.