चालकाचं नियंत्रण सुटल्याने एक्स्प्रेस वेवर गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 11:03 AM2017-10-24T11:03:18+5:302017-10-24T11:04:37+5:30
मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
लोणावळा- मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी सहा वाजता द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला. महामार्ग पोलीस विलास साळुंखे यांनी दिलेल्या माहीतीनुसार प्रितम विलास साळुंखे (वय २८ रा.वडगाव धायरी पुणे), राहुल हनमंत राजगुरु (वय २६ रा धनकवडू पुणे) असे मयत तरुणांची नावे असून, स्वप्निल अनिल घोरपडे (वय २६ रा.घोरपडी पुणे), प्रतिक भास्कर आमरे (वय २६ रा विठ्ठलवाडी,हिंगणे) हे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी गाडी आढे गावच्या हद्दीतून जात असताना चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंञण सुटले.त्यामुळी गाडी जवळील असलेल्या खोल ओढ्यात पडली.
अपघाताची माहीती मिळताच द्रुतगती महामार्ग पोलीस व महामार्ग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.व जखमींना रुग्णालयात दाखल केले.पुढील तपास तळेगाव पोलिस स्टेशन करीत आहे.