विहिरीलगत संरक्षक कठडे नसल्याने अपघात होण्याही शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:10 AM2021-04-18T04:10:21+5:302021-04-18T04:10:21+5:30

मंचर-शिरूर हा आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात जाणारा जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावरून दिवसभरात पहाटे पाचपासून ते रात्री एकपर्यंत १५०० ...

Accidents are also possible due to lack of protective walls near the well | विहिरीलगत संरक्षक कठडे नसल्याने अपघात होण्याही शक्यता

विहिरीलगत संरक्षक कठडे नसल्याने अपघात होण्याही शक्यता

Next

मंचर-शिरूर हा आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात जाणारा जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावरून दिवसभरात पहाटे पाचपासून ते रात्री एकपर्यंत १५०० ते २००० वाहनांची ये-जा होत असते. पूर्व भागात भीमाशंकर सहकारी साखर कारखानावर जाणारी वाहने, दूध वाहतूक करणारे टँकर, भाजीपाला टॅम्पो, खासगी कंपन्यांच्या बसेस, एस.टी.बस, रिक्षा इत्यादी गाड्यांची ये-जा होत असते. मागील वर्षी मंचर ते गावडेवाडी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आल्यानंतर गावडेवाडी, डेरेआंबा एस.टी. बसथांबा जवळ रस्त्यालगत विहीर आहे. विहीर रात्रीच्या वेळी लक्षात येत नसल्याने छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी बांधकाम विभागाने विहिरीलगत संरक्षक काठाडे बांधावेत, अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.

गावडेवाडी, डेरेआंबा रस्त्यालगत असलेल्या विहिरीला संरक्षक कठडे नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

Web Title: Accidents are also possible due to lack of protective walls near the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.