चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर वळणांमुळे अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:47 AM2018-12-16T01:47:02+5:302018-12-16T01:47:29+5:30

रस्त्याच्या मागणी : दुचाकी, चारचाकी व अवजड कंटेनरचे अपघात झाले नित्याचे

Accidents caused by winds on the Chakan-Shikrapur road | चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर वळणांमुळे अपघात वाढले

चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर वळणांमुळे अपघात वाढले

googlenewsNext

शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर असलेल्या दोन्ही धोकादायक वळणांमुळे दिवसेंदिवस या मार्गावरील अपघातांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि.१२) पहाटे तीनच्या सुमारास वळणावर शिक्रापूरहून - चाकणकडे जाणारा अवजड कंटेनर वाहतुकीदरम्यान पलटी झाला. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. वारंवार होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाय योजना करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

चाकण-शिक्रापूर राज्यमार्ग पुणे जिल्ह्यातील तीन ते चार महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींना जोडणारा रस्ता आहे. परिणामी, या मार्गावर कायम वर्दळ असते. परराज्यातून औद्योगिक वसाहतींना कच्चा माल पुरविणारे असंख्य अवजड कंटेनर याच मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील अपघातातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यमार्गावर खेड तालुक्याच्या हद्दीत साबळेवाडीच्या तसेच शेलपिंपळगावच्या पश्चिमेला ‘एस’ आकाराची धोकादायक वळणे आहेत. ही दोन्ही वळणे धोकादायक आहेत. या वळणावर रोज अपघात होत आहेत.

भीमा - भामा नदीलगत असलेल्या शेलपिंपळगावच्या वळणावर गॅसचे टँकर, ट्रक, मालवाहू गाड्या, दुधाचे ट्रक वळण घेत असताना सातत्याने पलटी होत आहेत. शेलपिंपळगावच्या वळणालगत भीमा-भामा नदीचा प्रवाह असल्याने सकाळपासून अनेक वाहतूकदार अंघोळीसाठी वाहने रस्त्यालगत उभी करून वाहतुकीत अडचण निर्माण करतात. यामुळे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातसदृश परिस्थीती निर्माण होते. तर, साबळेवाडीचे वळण चाकणकडून शिक्रापूरकडे जाताना चढ वाहतुकीचे आहे. त्यामुळे मुंबई, नाशिककडून औद्योगिक वसाहतींचा कच्चा माल घेऊन येणारी अवजड वाहने येथील वळणावर वाहतुकीदरम्यान अडकली जातात. मात्र, शिक्रापूरकडून चाकणबाजूकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना रस्त्याचा उतार धोकादायक ठरत असल्याने बहुतांशी वाहने जागीच पलटी होत आहेत. रस्त्यावरील दोन्ही ठिकाणच्या वळणांवर वाढते अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाय योजना कार्यान्वित करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहतूकदारांकडून केली जात आहे.

साबळेवाडी येथील वळणावर सातत्याने अवजड वाहने पलटी होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे, वळणाला कठडे उपलब्ध नसणे ही खेदाची बाब आहे. सूचना फलक व कठडे तातडीने बसविणे गरजेचे आहे.
- सुनील बेंडभर, स्थानिक नागरिक.

शेलपिंपळगाव वळणालगत असलेली झाडे वाढली आहेत. त्यामुळे शिक्रापूरकडून चाकणकडे जाणाºया वाहनांना समोरच्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने अपघात घडून येत आहेत. वळणाच्या दुतर्फा उभ्या केलेल्या वाहनांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली तर त्याठिकाणचे अवैध पार्किंग बंद होईल. - विद्या मोहिते, सरपंच शेलपिंपळगाव.

४महामार्गावरील दोन्ही धोकादायक वळणांवर सातत्याने मोठ-मोठे अपघात होत आहेत. परिणामी जीवितहानीचा आकडा वाढत चालला आहे. शेलपिंपळगावच्या वळणावर गेल्या वर्षभरात दहा ते बारा, तर साबळेवाडीच्या वळणावर पंधरा ते वीस वाहने वाहतुकीदरम्यान पलटी
झाली आहेत.

४वळणावर दुचाकींच्या अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. वळणावरील सूचना फलक जमीनदोस्त झाले असून जे सूचना फलक उभे आहेत ते अनेक व्यावसायिकांच्या स्वत:च्या जाहिरातीला बळी पडत आहेत. तर, साबळेवाडीच्या वळणाचे संपूर्ण कठडे तुटलेले आहे. परिणामी अपघातग्रस्त वाहने थेट खोल दरीत कोसळली
जात आहेत.
 

Web Title: Accidents caused by winds on the Chakan-Shikrapur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.