केंद्र सरकारमुळे रुग्णालयांमधला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:23 AM2021-01-13T04:23:58+5:302021-01-13T04:23:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सार्वजनिक आरोग्याबाबत केंद्र सरकारचे काहीही धोरण नसून त्यातूनच ही व्यवस्था कोलमडते आहे. अपघातांचे प्रमाणही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सार्वजनिक आरोग्याबाबत केंद्र सरकारचे काहीही धोरण नसून त्यातूनच ही व्यवस्था कोलमडते आहे. अपघातांचे प्रमाणही त्यातूनच वाढत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. महाविकास आघाडीने ही बाब जनतेसमोर आणावी आणि सरकारी रुग्णालयांच्या सुधारणेसाठी धोरण आखावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
भंडारा येथील अपघातानंतर आता हा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामागची कारणमिमांसाही जनतेसमोर येण्याची गरज असल्याचे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले. केंद्र सरकारने किमान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरी देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांचा आढावा घेऊन त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी देशस्तरीय धोरण आखले पाहिजे. प्रत्यक्षात केंद्र सरकार खासगी विमा कंपन्यांचा व्यवसाय चांगला कसा होईल याची काळजी करत आहे.
सातव्या पंचवार्षिक योजनेत वाढत्या लोकसंख्येचा विचार करून याविषयी धोरण सुचवण्यात आले होते, मात्र सरकारने योजना आयोगच गुंडाळून ठेवला. महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारची या संदर्भातील बेजबाबदार वृत्ती जनतेसमोर आणावी. महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनच्या सूचनांनुसार सरकारी रुग्णालयातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा, त्यातील त्रुटी दूर कराव्यात असे आवाहन तिवारी यांनी केले.