मानवी चुकांमुळे अपघातांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 06:25 AM2017-09-01T06:25:02+5:302017-09-01T06:25:11+5:30
भरधाव वेगाने जाणे, रस्त्यावरील सूचनांकडे दुर्लक्ष करणे, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे अशा विविध कारणांनी महामार्गावरील अपघातांत दिवसेंदिवस वाढ होत असून
पुणे : भरधाव वेगाने जाणे, रस्त्यावरील सूचनांकडे दुर्लक्ष करणे, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे अशा विविध कारणांनी महामार्गावरील अपघातांत दिवसेंदिवस वाढ होत असून,
एकूण अपघातांपैकी ५७ टक्के प्राणघातक अपघातांमध्ये मानवी चुका हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे़ पुणे-मुंबई दरम्यानच्या द्रुतगती महामार्गावरील गतवर्षी झालेल्या १५५ अपघातांच्या केलेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे़
पुणे-नाशिक रोडवर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला
मागून बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू
झाला होता़ तसेच राज्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांत अनेक प्राणघातक अपघात झाले होते़ पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर गतवर्षी झालेल्या अपघातांपैकी ५४ अपघात हे सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान झाले आहेत़ त्याखालोखाल मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ३१ अपघात झाले होते़ या १५५ अपघातांत २४० वाहने आणि १६ पादचाºयांचा समावेश होता़ त्यात सर्वाधिक ४१ टक्के मोटारी, ४० टक्के ट्रक यांचा समावेश होता़ पुणे जिल्ह्णात गेल्यां वर्षी ९६५ प्राणघातक अपघात झाले असून त्यात १०६१ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता़ मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या १५५ अपघातापैकी ९९ अपघातात ११८ जणांना प्राण गमवावे लागले तसेच ३०० जण गंभीर जखमी झाले होते़ या अपघातांचया अभ्यास जे पी़ रिसर्च इंडिया ने ट्रक केला़ त्यात अनेक निष्कर्ष समोर आले आहेत़
या अपघातांमध्ये कार आणि ट्रक यांचा ८० टक्के सहभाग होता़ त्यातील ५४ टक्के कारमधील किमान एका जणाचा मृत्यू झाला होता़ आणि ७१ टक्के वाहनांमधील किमान एक जण गंभीर जखमी झाला होता़ २१ टक्के ट्रकमधील एका जणाला मृत्यूला
सामोरे जावे लागले, तर १८ टक्के ट्रकमधील किमान एक जण गंभीर जखमी झाला होता़
मानवी चुकांमुळे झालेल्या अपघातात अतिवेगामुळे सर्वाधिक अपघात झाल्याचे दिसून येते़ एक्स्प्रेस-वेवर वाहनचालक लेनची शिस्त पाळताना दिसत नाही़ चुकीच्या पद्धतीने लेन कटिंग केल्यामुळे अपघाताचे प्रमाणही अधिक आहे़ त्याचबरोबर वाहन चालवताना चालकाला डुलकी लागणे त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला धडकून झालेल्या अपघातांचे प्रमाणही जास्त आहे़ वाहनचालकाने सीटबेल्ट न बांधल्यामुळे ५७ टक्के अपघाताताचे गांभीर्य वाढल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे़