दुचाकीने दिलेल्या धडकेच पती-पत्नी ठार; सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 06:19 PM2017-11-18T18:19:48+5:302017-11-18T18:22:34+5:30

हॉटेलात जेवण करून पायी घरी परतत असलेल्या पती-पत्नीस दुचाकीने धडक दिल्याने ते दोघेही मृत्युमुखी पडले आहेत. ही घटना सोलापूर-पुणे महामार्गावर शुक्रवारी (दि. १७) रात्री ९-१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

Accidents on the Solapur-Pune highway; husband-wife dead | दुचाकीने दिलेल्या धडकेच पती-पत्नी ठार; सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात

दुचाकीने दिलेल्या धडकेच पती-पत्नी ठार; सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात

Next
ठळक मुद्देअपघातामध्ये हनुमंत लोखंडे (वय ४५) व सुनीता लोखंडे (वय ४२) हे पती-पत्नी मृत्युमुखीदुचाकीचालक आकाश सरनाप्पा नागोरे याच्यावर गुन्हा दाखल

लोणी काळभोर : हॉटेलात जेवण करून पायी घरी परतत असलेल्या पती-पत्नीस दुचाकीने धडक दिल्याने ते दोघेही मृत्युमुखी पडले आहेत.  दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले असल्याची घटना सोलापूर-पुणे महामार्गावर शुक्रवारी (दि. १७) रात्री ९-१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार : या अपघातामध्ये हनुमंत विठ्ठल लोखंडे (वय ४५) व सुनीता हनुमंत लोखंडे (वय ४२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) हे पती-पत्नी) मृत्युमुखी पडले आहेत. दुचाकीवरील चालक आकाश सरनाप्पा नागोरे व त्याचे मित्र गुरुप्रसाद बाळासाहेब जानराव, लक्ष्मण गुरुप्रसाद चव्हाण (तिघेही रा. उरुळी कांचन) गंभीर जखमी झाले आहेत.
मृत सुनीता लोखंडे यांचे बंधू धनंजय रामदास पोपळघट (रा. तळवाडी चौक, उरुळी कांचन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार (दि. १७) लोखंडे पतीपत्नी हॉटेल सोनाई येथे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी सोलापूर-पुणे महामार्गावर इरिगेशन कॉलनीनजीक आले असता त्यांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या क्रमांक नसलेल्या दुचाकीने धडक दिली. यामुळे ते दोघे महामार्गावर व दुचाकीवरील तिघे रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी पाईपवर पडले.
स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच लोखंडे पती-पत्नी मृत झाले होते. दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औषधोपचार चालू आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी दुचाकीचालक आकाश सरनाप्पा नागोरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Accidents on the Solapur-Pune highway; husband-wife dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.