हवामान खात्याच्या अंदाजाला पावसाची हुलकावणी, राज्यात केवळ ४० टक्केच पेरण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 02:11 PM2022-07-01T14:11:33+5:302022-07-01T14:15:01+5:30
गेल्या वर्षी जूनअखेर सरासरीच्या १३६ टक्के पाऊस झाला होता...
-नितीन चौधरी
पुणे : यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार व जून महिन्यात सरासरीइतका पाऊस पडेल या आनंदवार्तेने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी तयारी केली. मात्र, हवामान विभागाचा अंदाज पुन्हा एकदा खोटा ठरला असून पावसाने हवामान विभागाच्या या अंदाजाला हुलकावणी दिली आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. राज्यात ३० जूनपर्यंत सरासरीच्या केवळ ७१ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी जूनअखेर सरासरीच्या १३६ टक्के पाऊस झाला होता.
राज्यात आतापर्यंत केवळ ४० टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी जूनअखेर १०४ टक्के पेरण्या झाल्या होत्या. चांगल्या पावसाअभावी ६० टक्के क्षेत्राच्या पेरण्या रखडल्या आहेत. राज्यात सर्वाधिक पेरण्या अमरावती विभागात ५० टक्के तर सर्वात कमी पेरण्या कोकण विभागात ८ टक्के झाल्या आहेत.
राज्याची जून महिन्याची सरासरी २०७.६ मिमी
सर्वाधिक पाऊस औरंगाबाद विभाग : १०२.३ टक्के
सर्वात कमी पाऊस पुणे विभाग : ४२.७ टक्के
विभाग पाऊस मिमी टक्के
कोकण ४५०.९ ६८.१
नाशिक ११०.९ ७९.४
पुणे ८४.९ ४२.७
औरंगाबाद १३७.१ १०२.३
अमरावती १०६.७ ७२.३
नागपूर ११८.१ ६३.१
राज्य १४७.५ ७१.१
राज्यातील २०२१ मधील जूनअखेरचा पाऊस : २८२.१ मिमी - एकूण टक्के १३५.९
राज्यातील पेरणी क्षेत्र : १ कोटी ४१ लाख ९७ हजार ६२५ हेक्टर
जूनअखेर पेरणी झालेले क्षेत्र : ५७ लाख १ हजार ६३ टक्केवारी : ४०.२
सर्वाधिक पेरणी झालेला विभाग : अमरावती - ५० टक्के
सर्वात कमी पेरणी झालेला विभाग : कोकण - ८ टक्के
राज्यात सोयाबीन व कापसाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यात जूनअखेर सोयाबीनची ५१ टक्के तर कापसाची ५७ टक्के पेरणी झाली आहे.
विभाग पेरणी (टक्के)
कोकण ८
नाशिक ४०
पुणे २८
कोल्हापूर २४
औरंगाबाद ४५
लातूर ४८
अमरावती ५०
नागपूर २७
राज्य ४०
पीकनिहाय पेरणी क्षेत्र
पीक क्षेत्र टक्के
भात १२६९२५ ८
ज्वारी ३४९४० ७
बाजरी १११७५० १७
नाचणी ४५३० ५
मका २९८८५५ ३६
एकूण तृणधान्य ५८१५०१ १६
तूर ४७१९७३ ३७
मूग १२७३६६ २६
उडीद ११७६१६ ३३
एकूण कडधान्य ७२५७७४ ३३
भुईमूग ३८१३३ १९
सोयाबीन १९८६३४८ ५१
सूर्यफूल ३१४३ १७
एकूण तेलबिया २०२९०९४ ४९
कापूस २३६४६९३ ५७
राज्यात आतापर्यंत पाऊस कमी झाल्याने अद्याप ६० टक्के पेरण्या झालेल्या नाहीत. मात्र, पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर भागांत पेरण्यांना जोमात सुरुवात झाली आहे. येत्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यास पेरण्यांची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. जूनमध्ये होणाऱ्या उडीद-मुगाच्या पेरण्या आता होणार नाहीत. त्याचे क्षेत्र तूर पिकाकडे वळू शकते. राज्यात मुगाच्या पेरण्या २६ तर उडदाच्या पेरण्या ३३ टक्के झाल्या आहेत. शेतकरी आता चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत. बियाणे व खते पर्याप्त मात्रेत उपलब्ध आहेत.
- दिलीप झेंडे, संचालक, कृषी निविष्ठा