समर्थ पॉलिटेक्निकमध्ये मेकॅट्रॉनिक्स अभ्यासक्रमास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:21+5:302021-07-12T04:08:21+5:30
या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता प्रथम वर्षासाठी ३० इतकी असणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची संलग्नता असणार आहे.पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण ...
या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता प्रथम वर्षासाठी ३० इतकी असणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची संलग्नता असणार आहे.पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणारे समर्थ पॉलिटेक्निक हे पहिलेच तंत्रनिकेतन ठरलेले आहे.मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही अभियांत्रिकीची उदयोन्मुख शाखा असून बदलत्या कालानुरूप हा अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक होते.नवनवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या शाखेला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेले आहे.
या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत रोबोटिक्स,मेकॅनिकल इंजिनियरिंग,इलेक्ट्रॉनिक्स,कॉम्प्युटर इंजिनियरिंग,टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग, सिस्टम इंजिनियरिंग कंट्रोल इंजिनियरिंग इत्यादी विविध शाखांमधील महत्त्वाच्या घटकांचा समावेश केला जातो.ऑटोमोबाईल क्षेत्रात होत असलेले बदल विशेष करून इलेक्ट्रिकल वाहनांची निर्मिती व त्यामुळे या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या व व्यवसायाच्या प्रचंड संधी लक्षात घेता विद्यार्थी व पालकांची सदर अभ्यासक्रम सुरू करण्यास मागणी होती.सदर अभ्यासक्रम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची फार मोठी सोय होणार आहे. या अभ्यासक्रमाचे प्रवेश शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार होणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रा.अनिल कपिले यांच्याशी संपर्क करावा.