अचूक अभ्यासानेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:11 AM2021-09-27T04:11:13+5:302021-09-27T04:11:13+5:30
आंबेठाण : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा बदललेला अभ्यासक्रम ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी उपयुक्त आहे. तो त्यांनी ...
आंबेठाण : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा बदललेला अभ्यासक्रम ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी उपयुक्त आहे. तो त्यांनी समजावून घेऊन अचूक अभ्यासाचे तंत्र अवगत करून तयारी करावी. भरमसाठ वाचण्यापेक्षा महत्त्वाचे आणि मुद्देसूद वाचावे, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या विषयांच्या नोंदी ठेवाव्यात, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे पुणे विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी केले.
जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी वराळे येथे सुरू केलेल्या कमलाई स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, शरद बुट्टे पाटील, प्रतापराव पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरघंटीवार, कैलास टाकळकर, कचर येवले, पालक संघाचे अध्यक्ष सुनील देवकर, संजय रौंधळ, दत्ता टेमगिरे, आबा सांडभोर, रोहित डावरे यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाईकडे म्हणाले की, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका एक उत्तम सोय झाली असून विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन आणि सूत्र ठरवल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे अवघड नाही. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये यश मिळाल्यानंतर देखील आपल्या स्वभावात नम्रता ठेवावी आणि संयमाने काम केले तर प्रशासकीय सेवेत उत्तम काम करण्याची संधी असते. शरद बुट्टे पाटील म्हणाले की, अभ्यास करणारे विद्यार्थी सांगतील ती सर्व प्रकारची पुस्तके आणि नोट्स या अभ्यासिकेत उपलब्ध करून दिल्या जातील. यावेळी वीरधवल जगदाळे यांनी ही आपले विचार व्यक्त केले. उपस्थित स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके आणि नोटबुक भेट देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश चव्हाण यांनी केले, तर आभार कैलास टाकळकर यांनी मानले.
260921\img-20210924-wa0027.jpg
??????? ??????? ????????? ? ???????? ??????????? ??????? ?????? ? ??????? ??????????