घरफोड्या करणारा सराईत अटकेत

By admin | Published: April 21, 2017 06:04 AM2017-04-21T06:04:15+5:302017-04-21T06:04:15+5:30

शहरातील हडपसर, मुंढवा, चंदननगर परिसरात दिवसा घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी

The accused is absconding | घरफोड्या करणारा सराईत अटकेत

घरफोड्या करणारा सराईत अटकेत

Next

पुणे : शहरातील हडपसर, मुंढवा, चंदननगर परिसरात दिवसा घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सचिन भीमराव पाटील (२७, मुंढवा) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मुंढवा येथील रेल्वे पुलाखाली एक व्यक्ती बसलेली असून ती संशयितरीत्या चकरा मारत असल्याची माहिती मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना हवालदार कैलास चव्हाण यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे गेले. मात्र पोलिसांना पाहताच तो तेथून पळून जाण्याच्या तयारीत होता. त्या वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. तसेच त्याच्या स्कूटरची झडती घेतली तेव्हा तिच्या डिक्कीत एक कॅनन कंपनीचा कॅमेरा आणि एक लोखंडी टॉमी मिळून आली. त्या वेळी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्याकडील कॅमेरा हा केशवनगर येथे घरफोडी करून चोरल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने हडपसर, चंदननगर आणि मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या तीन घरफोड्यांची कबुली दिली आणि पोलिसांनी या घरफोड्यांतील एकूण ४ लाख २८ हजार ५५0 रुपये किमतीचे सोन्याचे १२७ ग्रॅम वजनाचे दागिने, कॅनन कंपनीचा कॅमेरा, एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: The accused is absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.