महिलेस शिवीगाळ आणि मारहाण केल्याने गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:10 AM2021-03-21T04:10:49+5:302021-03-21T04:10:49+5:30
सरपंच योगेश पाटे , ग्रा.पं.सदस्य आरीफ आतार यांचेसह निवृत्ती तांबे आणि आकाश कानसकर यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार ...
सरपंच योगेश पाटे , ग्रा.पं.सदस्य आरीफ आतार यांचेसह निवृत्ती तांबे आणि आकाश कानसकर यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे .या तक्रारी वरून नारायणगाव पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
नारायणगाव येथील सर्वे नं. २४/१९४ व २५/१९३ मधील सार्वजनिक बांधावरील एका शेतकऱ्याने अतिक्रमण करून रस्त्यात उस लागवड केली.हे अतिक्रमण सरपंच योगेश पाटे , ग्रा.पं.सदस्य आरीफ आतार , निवृत्ती तांबे आणि आकाश कानसकर हे हटवित असताना झालेल्या वादातून एका महिलेने नारायणगाव पोलीस ठाण्यात शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार दिली.अदखल पात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गेली दोन दिवसांपासून या घटनेची चर्चा सोशल मिडीयावर सुरू झाली. या प्रकारानंतर अनेक शेतक-यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात जाऊन सरपंच योगेश पाटे यांचेवर खोटा व राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्याचा आरोप केला .