मावळे आळीतील खूनप्रकरणी आरोपी अटकेत
By admin | Published: June 1, 2017 02:38 AM2017-06-01T02:38:33+5:302017-06-01T02:38:33+5:30
राग मनात धरून मित्राचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या मृत तरुणाची
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राग मनात धरून मित्राचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या मृत तरुणाची ओळखही पोलिसांना पटली आहे.
राजू गीरमला साबळे (वय २५ रा. म्हाडा वसाहत ए/३0४ वारजे माळवाडी) असे तरुणाचे नाव आहे. मन्या ऊर्फ मनोज रघुनाथ सोनवणे (वय २८, रा. कामना वसाहत, कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर येथील मावळे आळीत एका पडीक खोलीमध्ये दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला होता; मात्र त्याची ओळख पटली नव्हती. साबळे हा मनोज सोनवणे याची पत्नी बदचलन असल्याचे वेळोवेळी सर्वांसमोर सांगून त्याला हिणवत होता. त्याचा राग मनात ठेवून दोन दिवसांपूर्वी आरोपीने त्याला दारू पाजून पडीक खोलीत नेले. तो झोपला असताना झोपेतच त्याचा गळा धारदार कटरने कापून त्याचा खून केला. त्याच्याजवळील मोबाईल घेऊन निघून गेला. दाखल गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना चोवीस तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात आली. अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग रवींद्र सेनगावकर व परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त शरद उगले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) खांडेकर, सहायक पोलीस निरीक्षक राऊत, सहायक पोलीस फौजदार गोरे, पोलीस हवालदार मोरे, पोलीस नाईक संतोष देशपांडे, सुधीर पाटील, चंद्रशेखर जाधव, पोलीस शिपाई संजय दहिभाते, योगेश सूळ, नितीन जगदाळे, विजय कांबळे, सचिन धोत्रे, अजय सावंत यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ( गुन्हे) खांडेकर करीत आहेत.