बँकांना फसवणाऱ्या आरोपीला अटक
By admin | Published: April 22, 2017 03:34 AM2017-04-22T03:34:22+5:302017-04-22T03:34:22+5:30
राष्ट्रीय व सहकारी बँकांना बनावट डीमांड ड्राफ्टचा वापर करून एक हजार कोटीच्या पुढे गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपींमधील एक संतोष गडगे याला नारायणगाव पोलिसांच्या
नारायणगाव : राष्ट्रीय व सहकारी बँकांना बनावट डीमांड ड्राफ्टचा वापर करून एक हजार कोटीच्या पुढे गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपींमधील एक संतोष गडगे याला नारायणगाव पोलिसांच्या मदतीने सापळा रचून अटक करण्यात आली आहे. गडगे याला मुंबई न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत (दि. २४) पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई सीबीआय विभागाचे सहायक आयुक्त बी. एम. चोणकर व सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.
संतोष गडगे (रा. नवी मुंबई, मूळ रा. वडगाव आनंद, ता. जुन्नर, जि. पुणे) याला मुंबई सीबीआय विभाग व नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुजावर, हेमंत भंगाळे, शंकर भवारी, दीपक साबळे, शरद सुरकुले, प्रवीण लोहोटे यांनी सापळा रचून नारायणगाव येथून अटक केली.
२०१५ मध्ये मुंबईतील विविध राष्ट्रीय व सहकारी बँकांमध्ये शासकीय योजनांचे अनुदान बँकांमध्ये जमा होत असतात. गडगे हे काम असलेले अनुदान काही सहकाऱ्यांच्या मदतीने बनावट डीमांड ड्राफ्ट तयार करून बँकेतून काढून घेत असे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू होता. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर गडगे फरार झाला होता.
याप्रकरणी मुंबई सीबीआय त्याच्या व सहकाऱ्यांच्या मागावर होती. अखेर गाडगे जुन्नर तालुक्यात असल्याची माहिती मिळाल्याने नारायणगाव पोलिसांच्या
मदतीने त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.(वार्ताहर)
- हा घोटाळा सुमारे एक हजार कोटीच्या पुढे असल्याने या घोटाळ्याचा तपास मुंबईतून सुरू आहे. यातील काही
मुख्य आरोपी व त्यांना या कामात मदत करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी मुंबई सीबीआय विभागाचे सहायक आयुक्त बी. एम. चोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक एस. एन. मुरकुटे, पोलीस हवालदार
डी. के. ढगे, राजेश खुशलानी करीत आहेत.