गोये खुनाचा उलगडा करण्यात यश, आरोपींला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:21+5:302021-07-07T04:13:21+5:30
जुन्या भांडणाच्या वादातून गोविंद विठ्ठल मधे व त्याच्या साथीदारांनी मिळून दि. २७ रोजी कोयता व लोखंडी रॉडने मारहाण ...
जुन्या भांडणाच्या वादातून गोविंद विठ्ठल मधे व त्याच्या साथीदारांनी मिळून दि. २७ रोजी कोयता व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. जखमी झालेल्या कैलास उर्फ बाबू दशरथ गेंगजे याचा दवाखान्यात मृत्यू झाला होता. याप्रकरणी घोडेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नारायणगाव हद्दीत गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी गोविंद मधे हा नारायणगाव टोमॅटो मार्केट येथे येणार आहे. पोलिसांनी सापळा लावून गोविंद विठ्ठल मधे (वय २९) (रा. गंगापूर बु., ता. आंबेगाव) यास अटक केली. त्याने व त्याच्या मित्रांनी मिळून कैलास उर्फ बाबू दशरथ गेंगजे याला मारहाण केल्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी घोडेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या गुन्ह्यात यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अद्याप एक आरोपी फरार आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सपोनि नेताजी गंधारे, पोलीस हवालदार विक्रम तापकीर, हनुमंत पासलकर,
पोलीस नाईक दीपक साबळे, पोलीस शिपाई संदीप वारे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर, मुकुंद कदम, दगडू वीरकर व पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी केली.