समृद्ध जीवन घोटाळ्यातील आरोपीला अटक; सीआयडीला ७ वर्षे देत होता हुलकावणी

By राजू इनामदार | Published: December 7, 2023 04:09 PM2023-12-07T16:09:38+5:302023-12-07T16:10:29+5:30

गेल्या ७ वर्षांपासून तो पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी ओळख लपवून राहत असल्याने मिळून येत नव्हता

Accused arrested in Samrudh Jeevan scam 7 years suspended for CID | समृद्ध जीवन घोटाळ्यातील आरोपीला अटक; सीआयडीला ७ वर्षे देत होता हुलकावणी

समृद्ध जीवन घोटाळ्यातील आरोपीला अटक; सीआयडीला ७ वर्षे देत होता हुलकावणी

पुणे : देशभरातील गुंतवणुकदारांची ५ हजार कोटींची फसवणूक करणाऱ्या समृद्ध जीवन घोटाळ्यातील ७ वर्षे सीआयडीला हुलकावणी देत असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

रामलिंग हिंगे (वय ५६, रा. गोकुळनगर, कात्रज) असे त्याचे नाव आहे. समृद्ध जीवन फुडस इंडिया व समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज को ऑप सोसायटीचा सर्वेसर्वा महेश मोतेवार व रामलिंग हिंगे यांनी संपूर्ण देशभरात कंपनीच्या अनेक शाखा उघडल्या. त्या माध्यमातून गुंतवणुकदारांची ४ हजार ७२५ कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंगे हा फरार झाला होता. गेल्या ७ वर्षांपासून तो पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी ओळख लपवून राहत असल्याने मिळून येत नव्हता. रामलिंग हिंगे हा सातारा रोडवरील सिटी प्राईड येथे येणार असल्याची माहिती सीआयडी पथकाला मिळाली. त्यांनी हिंगे याला ताब्यात घेतले.

समृद्ध जीवन समूहाविरुद्ध भारतभरात एकूण २६ गुन्हे दाखल आहेत. संपूर्ण भारतातील ६४ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांची व महाराष्ट्रातील एकूण १८ लाख गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांतील एकूण २५ आरोपींपैकी महेश मोतेवारसह १६ जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, अपर पोलीस अधीक्षक तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद रावडे, हवालदार सुनिल बनसोडे, प्रदीप चव्हाण, कोळी यांनी ही कारवाई केली.

Web Title: Accused arrested in Samrudh Jeevan scam 7 years suspended for CID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.