व्यापारी विशाल पंजाबी गोळीबार प्रकरणी आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:11 AM2021-03-19T04:11:59+5:302021-03-19T04:11:59+5:30
अशोक गोविंदराव गवई (रा. यश अपार्टमेंट, वारजे माळवाडी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रामधन भगीरथी विश्वकर्मा (रा. ...
अशोक गोविंदराव गवई (रा. यश अपार्टमेंट, वारजे माळवाडी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रामधन भगीरथी विश्वकर्मा (रा. संतोषनगर, कात्रज, मूळ उत्तर प्रदेश), सुरजकुमार आणि राजासिंग ऊर्फ राजकुमार (रा. संतोषनगर, मूळ उत्तर प्रदेश) अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुन्हा केल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. मात्र त्यांचा माग लागत नव्हता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस शिपाई जगदीश खेडकर यांनी अशोक गोवईच्या घरचा पत्ता मिळवला. पोलीस पथकाने तेथे धडक दिली असता, गवई घरी सापडला नाही. दरम्यान पोलीस नाईक प्रणव संकपाळ, पोलीस शिपाई संतोष अनुसे व शिवदत्त गायकवाड यांना गवई आंबेगाव चौकात येणार असल्याची खबर मिळाली. त्या आधारे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चाकैशी केली असता, त्याने तीघा साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार गणेश सुतार, पोलीस अंमलदार प्रणव संकपाळ जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, संतोष अनुसे, मंगेश बोरुडे यांच्या पथकाने केली.