नीरानृसिंहपूर येथील खूनप्रकरणी आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:56 AM2017-08-13T03:56:52+5:302017-08-13T03:56:52+5:30
इंदापूर पोलीस खात्याने त्वरेने तपास करत अवघ्या एकाच दिवसात निरानृसिंहपूर खून प्रकरणातील मुख्य आरोपी मारुती मच्छिंद्र काळे याच्या शुक्रवारी (दि.११) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुसक्या आवळल्या.
इंदापूर : इंदापूर पोलीस खात्याने त्वरेने तपास करत अवघ्या एकाच दिवसात निरानृसिंहपूर खून प्रकरणातील मुख्य आरोपी मारुती मच्छिंद्र काळे याच्या शुक्रवारी (दि.११) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुसक्या आवळल्या. काळे यास दि.१७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश इंदापूर न्यायालयाने दिले आहेत.
नीलेश नागनाथ घळके याचा पूर्ववैमनस्यातुन खून झाला होता.
या प्रकरणी आरोपी फरारी होता. तो आपल्या रानातच लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी आपले सहकारी संजय जाधव व इतरांसमवेत नीरानृसिंहपूर येथील आरोपीच्या रानाला वेढा दिला. लपून बसलेल्या आरोपीला शोधून काढले.
आज सकाळी त्याला इंदापूर न्यायालयात हजर करण्यात आले.
या गुन्ह्यातील सहआरोपी असणारी युवती फरार आहे.