बुधवार पेठेतील महिलेच्या खूनप्रकरणी आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:12 AM2021-05-09T04:12:46+5:302021-05-09T04:12:46+5:30
पुणे : बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा खून करून आसामला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला फरासखाना पोलिसांनी अटक केली ...
पुणे : बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा खून करून आसामला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ५ मे रोजी पहाटे घडली होती. मोहंमद बहरूल हक (रा. काळेवाडी, मूळ- आसाम) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
या घटनेत २३ वर्षांच्या महिलेचा पाच मे रोजी पहाटे खून झाला होता. खून झालेल्या महिलेकडे आरोपी बुधवार पेठेत येत होता. त्यांच्यात वाद झाल्यानंतर धारदार शस्त्राने वार करून खून करत आरोपी पसार झाला होता. त्याचा फरासखाना पोलीस शोध घेत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके आरोपीचा शोध घेत होती. त्यावेळी हक हा काळेवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. तसेच तो आसामला पळून जाण्याच्या तयारी असल्याचे समजले. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.