शिरूर तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या दरोडा प्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 12:42 PM2021-10-29T12:42:26+5:302021-10-29T12:42:56+5:30
२१ ऑक्टोबर रोजी भरदिवसा पावणे दोन वाजेच्या सुमारास मध्ये पिंपरखेड तालुका शिरूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर पाच जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा घातला होता.
टाकळी हाजी : पिंपरखेड तालुका शिरूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या दरोडा प्रकरणातील आरोपी जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. २१ ऑक्टोबर रोजी भरदिवसा पावणे दोन वाजेच्या सुमारास मध्ये पिंपरखेड तालुका शिरूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर पाच जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा घातला होता.
यामध्ये दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच ३१ लाख रुपये रोकड असा दोन कोटी ३१ लाख रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले होते .पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस पथकाने शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व टीमने प्रचाराचे सूत्र हातात घेतले .पुणे व नगर जिल्ह्यात तपास करीत असताना आरोपीचा शोध घेण्यात यश मिळाले असून आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे .
यातील मुख्य सूत्रधार हा आणि गुन्ह्यातील सराईत आरोपी असून निघोज तालुका पारनेर येथील आहे .या मधील आरोपी वाळू तस्करी व जुगारी असून आणि गुन्ह्याची नोंद त्यांच्या नावावर असल्याचे समजते. परिसरामधील आरोपींनी बँक लुटण्याचा प्रकार केल्यामुळे विश्वास नेमका ठेवावा कुणावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात सध्या जुगार अवैध वाळू व्यवसायिक यांच्यामुळे तरुणवर्ग वाममार्गाकडे चाललेला असून हेच लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे झाले आहेत. त्यामुळे सामान्य जनता ही हतबल झाली आहे. या गुन्ह्याबाबत अधिकृत माहिती पोलीस देणार असून त्यानंतरच आरोपींचे नावे निष्पन्न होणार आहे .