२ कोटी ३ लाखांचे कर्ज बुडवणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:30 PM2021-03-17T16:30:39+5:302021-03-17T16:31:40+5:30
बनावट आदेश तयार करून घेतले होते कर्ज
पुणे: टाटा फायनान्स यांच्याकडून दोन कोटी तीन लाख कर्ज घेणाऱ्या दोघांना आझाद मैदान पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तर त्यासाठी बनावट आदेश तयार करणाऱ्या वकिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जीवन नेमीचंद बेताळा (वय ४६) आणि जयश्री वसंत पारख (वय ५६) या कर्ज घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत पारख, विपुल वसंत पारख, जयश्री वसंत पारख यांनी आपापसात संगनमत करून टाटा फायनान्स या कंपनीकडून २ कोटी ३ लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जासाठी बनावट आदेशाची प्रत ऍड आशुतोष रानडे आणि योगेश पुरंदरे यांच्या मदतीने तयार केली. या बनावट आदेशाप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी गोपनीय खबऱ्यांमार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर यांना आरोपी राहत्या घरी असल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी पोलीस निरीक्षक शिल्पा, जुबेर मुजावर आणि त्यांच्या पथकाने जयश्री पारख आणि जीवन बेताळा यांना अटक केली आहे.