Pune Police: पुण्यात रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत कैद्याचा मृत्यु; नातेवाईकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 07:29 PM2022-08-24T19:29:27+5:302022-08-24T20:42:57+5:30

न्यायालयाने आरोपीला २५ ऑगस्ट पर्यत पोलिस कोठडी दिली होती

Accused dies after being beaten up by police in police custody in Pune | Pune Police: पुण्यात रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत कैद्याचा मृत्यु; नातेवाईकांचा आरोप

Pune Police: पुण्यात रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत कैद्याचा मृत्यु; नातेवाईकांचा आरोप

googlenewsNext

पुणे: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत असताना, उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. नागेश रामदास पवार (२७, हडपसर, मुळ रा. मोहोळ, सोलापूर) असे मृत आरोपीचे नाव आहे. तर पोलिसांच्या मारहाणीमुळेच माझ्या नवऱ्याचा मृत्यु झाला, असा आरोप या वेळी मयताची पत्नी ताई पवार हिने केला आहे.

पवार हा विविध चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी होता. त्याला रेल्वे पोलिसांनी अटक करून १७ ऑगस्टला न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्याला २५ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यादरम्यान पोलिसांनी त्याला मारहाण केली, त्यात तो आजारी पडल्याने पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान बुधवारी (२४ ऑगस्ट) त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मात्र नागेशच्या मृत्युला रेल्वे पोलिसच जबाबदार आहेत, असा आरोप मयत नागेशची बायको आणि बहिणीने केला आहे.

आम्ही माणुसकी दाखवली..

मयत नागेश पवार हा चोरी आणि दरोड्यातील ११ गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. न्यायालयाने त्याला १७ ऑगस्ट रोजी पोलिस कोठडी सुनावली होती. यानंतर २० ऑगस्ट रोजी त्याला थंडी, ताप आल्याने ससून रुग्णालयात आम्ही दाखल केले होते. दरम्यान त्याला फिट येऊन उलटी झाली. डॉक्टरांनी त्याला निमोनिया झाल्याचे सांगितल्यावर आम्ही आयसीयुमध्ये दाखल करत त्याच्यावर उपचार सुरू ठेवले. या वेळी न्यायालयाने ऑनलाइन त्याला पोलिसांनी मारहाण केली का असे विचारले होते, त्यावेळी मयत आरोपीने नाही असे सांगितले होते. तो कोठडीत असताना तेथील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात आले आहे. तसेच इन क`मेरा पंचनामा केला असता देखील त्यावर मारहाणीचे कोणतेही पुरावे आढळलेले नाही. यामुळे आमच्यावर लावण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत, उलट आम्ही माणुसकी दाखवत त्याच्यावर सर्वोतपरी उपचार केले, अशी माहिती रेल्वे पोलिस अधिक्षक सदानंद वायसे - पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

नागेश हा चांगला आणि होतकरू मुलगा

नागेश हा चांगला आणि होतकरू मुलगा होता. छोटे-मोठे काम करून त्याचे आणि परिवाराचे पोट भरत होता. त्याची ३ मुले आज उघड्यावर पडली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, आणि संबंधितांवर कठोर कारवाई देखील व्हावी अशी आमची मागणी आहे. - गिरीश प्रभुणे, समाजसेवक

Web Title: Accused dies after being beaten up by police in police custody in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.