मजुरास लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Published: May 14, 2016 12:29 AM2016-05-14T00:29:26+5:302016-05-14T00:29:26+5:30
मजुरीकाम करून चाकण बसस्थानकाच्या आवारात झोपणाऱ्या मजुरास व त्याच्या साथीदारास आज पहाटे १ वाजण्याच्या सुमारास तंबाखू मागण्याच्या बहाण्याने जागे करून आठ जणांनी
चाकण : मजुरीकाम करून चाकण बसस्थानकाच्या आवारात झोपणाऱ्या मजुरास व त्याच्या साथीदारास आज पहाटे १ वाजण्याच्या सुमारास तंबाखू मागण्याच्या बहाण्याने जागे करून आठ जणांनी त्याच्या गळ्यास चाकू लावून मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.
याबाबत संजय मुखामसिंग (सध्या रा. चाकण, मूळ रा. मनेर पटणा) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, याप्रकरणी चाकण पोलीस
ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश
मुंढे व पोलीस हवालदार रमेश नाळे, संजय जरे, अनिल गोरड यांनी
सापळा रचून रविकिरण शेखर कळसकर (वय १८, बलूतआळी, चाकण), अमोल विश्वनाथ
लाटूकर (वय १९, एकतानगर, चाकण) व विधी संघर्षग्रस्त बालक मोनेश
संजय घोगरे (वय १६, रा. आंबेडकर नगर,चाकण), नवनाथ बाळू धोंगडे (वय १७ रा.धाडगे आळी, चाकण), रज्जाक शबीर सय्यद (वय १६, रा. आंबेडकर नगर, चाकण), रवी
गोवर्धन सातोळे (वय १७ रा. वडारवस्ती, चाकण), रामनाथ
सुखदेव घोडके (वय १६, रा. भुजबळ आळी, चाकण), समाधान ऊर्फ सोन्या देशमुख (रा. आंबेठाण रोड, चाकण) या आरोपींना ताब्यात
घेतले असून वरीलपैकी दोन
आरोपी, अमोल विश्वनाथ
लाटुकर व रविकिरण
शेखर कळसकर या दोन आरोपींना
खेड न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.
(वार्ताहर)