स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Published: March 26, 2017 01:17 AM2017-03-26T01:17:40+5:302017-03-26T01:17:40+5:30

जिलेटीन व डिटोनेटर असे स्फोटक पदार्थ विनापरवाना जवळ बाळगले व वाहतूक केली म्हणून सासवड पोलिसांनी

The accused filed a case against them for carrying explosives | स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next

सासवड : जिलेटीन व डिटोनेटर असे स्फोटक पदार्थ विनापरवाना जवळ बाळगले व वाहतूक केली म्हणून सासवड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सासवड नारायणपूर रस्त्यावरील कामळेश्वर मंदिराजवळ एका ट्रॅक्टरमधून हे पदार्थ वाहतूक करण्यात येत होते. ज्ञानेश्वर झेंडे (वय ३५, रा. दिवे ता. पुरंदर) व देविदास काळे (वय ४०, रा. सोनोरी, ता. पुरंदर) या दोघांवर सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
दि. २४ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास लाल रंगाच्या टॅ्रक्टरमधून हे स्फोटक पदार्थ नेले जात होते. स्फोटक पदार्थ बाळगण्याचा किंवा वाहतूक करण्याचा कोणताही परवाना टॅ्रक्टरमधील दोघांकडे आढळून आला नाही . जिलेटीनच्या ६८ कांड्या व डिटोनेटरचे ४१ नग टॅ्रक्टरमध्ये आढळून आले . आरोग्यास व जीवास धोका उत्पन्न करणारे स्फोटक पदार्थ विनापरवाना बाळगले व निष्काळजीपणे वाहतूक केली म्हणून सासवड पोलिसांनी झेंडे व काळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The accused filed a case against them for carrying explosives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.