पुणे स्टेशनवर फिल्मी स्टाईल थरार ; पाेलिसांवर अाराेपींचा गाेळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 06:18 PM2018-11-21T18:18:52+5:302018-11-21T18:22:30+5:30

गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे कर्मचारी चंदननगर येथील गुन्ह्यातील अाराेपींचा पुणे स्टेशनवर शाेध घेत असताना अाराेपींनी पाेलिसांना पाहताच गाेळीबार केला.

accused fire on police officers at pune railway station ; one officer injured | पुणे स्टेशनवर फिल्मी स्टाईल थरार ; पाेलिसांवर अाराेपींचा गाेळीबार

पुणे स्टेशनवर फिल्मी स्टाईल थरार ; पाेलिसांवर अाराेपींचा गाेळीबार

Next

पुणे :  सिनेमांमध्ये दाखवण्यात येताे तसा थरार अाज पुणे स्टेशनवरील प्लॅटफाॅर्म क्रमांक 3 च्या प्रवाशांना संध्याकाळी 5.15 च्या सुमारास पाहायला मिळाला. अाज सकाळी चंदननगर येथील इंद्रायणी गृहरचना साेसायटी मधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी (वय 34) यांच्यावर गाेळीबार करणारे अाराेपी पळून चालले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दाेनच्या पथकाला मिळाली हाेती. या माहितीच्या अाधारे गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे कर्मचारी अाराेपींचा पुणे स्टेशनवर शाेध घेत असताना अाराेपींनी पाेलिसांना पाहताच गाेळीबार केला. या गाेळीबारात पाेलीस निरीक्षक गजानन पवार गंभीर जखमी झाले अाहेत. दरम्यान तीन पैकी दाेन अाराेपींना पाेलिसांना पकडण्यात यथ अाले अाहे. 

     चंदननगर येथील इंद्रयणी गृहरचना साेसायटीत राहणाऱ्या एकता भाटी यांच्यावर सकाळी अाठ वाजून 15 मिनिटांनी दाेन तरुणांनी घरात घुसून गाेळीबार केला हाेता. यात भाटी यांचा मृत्यू झाला अाहे. या घटनेचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या युनिट दाेनच्या अधिकाऱ्यांना या गुन्ह्यातील अाराेपी हे झेलम एक्सप्रेसने पळून चालले असल्याची माहिती मिळाली. युनिट दाेनचे पाेलीस निरीक्षक पवार हे सहकाऱ्यांसह अाराेपींचा प्लॅटफाॅर्म 3 वर शाेध घेत हाेते. त्यावेळी अाराेपींनी पाेलिसांना पाहताच पळ काढला. यातील एका अाराेपीने पवार यांच्यावर गाेळी झाडली. पवारांच्या पाेटात गाेळी लागल्याने माेठा रक्तस्त्राव झाला. पवारांच्या साेबतच्या सहकाऱ्यांनी एका अाराेपीला पकडले तर रेल्वे पाेलिसांनी अाणखी एका अाराेपीला पकडले. तिसरा अाराेपी पळून गेला.


    दरम्यान पवार यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले असून त्यांची प्रकृती गंभीर अाहे.  

Web Title: accused fire on police officers at pune railway station ; one officer injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.