आरोपी गेला पळून
By admin | Published: June 15, 2014 04:03 AM2014-06-15T04:03:18+5:302014-06-15T04:03:18+5:30
केडगाव ग्रामस्थांना आज पोलिसांच्या तावडीतून सुटलेला आरोपी व त्याच्यामागे पळत असलेले पोलीस, असा सिनेस्टाईल थरार पहावयास मिळाला
केडगाव : केडगाव ग्रामस्थांना आज पोलिसांच्या तावडीतून सुटलेला आरोपी व त्याच्यामागे पळत असलेले पोलीस, असा सिनेस्टाईल थरार पहावयास मिळाला.
पाटस (ता. दौंड) येथील शंकर वाबळे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी योगेश वाबळे (वय २१, रा. पाटस) याला यवत पोलीस स्टेशनचे पोलीस पाटस येथून यवतकडे नेत होते. त्याच वेळी पोलीस आरोपीसह चौफुला येथे आले असता आरोपीने पोलिसांना हिसका देऊन सुपे गावाकडे पळ काढला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला; पण आरोपी दडी मारून बसल्याने पोलिसांना तो सापडला नाही. थोड्या वेळाने आरोपीच्या पाळतीवर असणाऱ्या पोलिसांना आरोपी एका दुचाकीला लिफ्ट घेऊन केडगावकडे जात असताना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी चौफुला ते केडगाव आरोपीचा पाठलाग केला. केडगाव येथील रेल्वे उड्डाणपुलावर आरोपी उतरला.
या मोहिमेत यवत पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जाधव, हवालदार भगत, चितारे, जावळे, शिंदे यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)