पुण्यातील विश्रामबाग पोलीस लॉकअपमध्ये चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 08:50 AM2023-05-17T08:50:52+5:302023-05-17T08:53:03+5:30
आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला...
- किरण शिंदे
पुणे : पुण्यात पोलीस लॉकअपमध्ये चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शिवाजी उत्तम गरड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, एका वाहन चोरीच्या गुन्ह्यात शिवाजी गरड याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर त्याला विश्रामबाग पोलीस स्टेशन परिसरात असणाऱ्या पोलीस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कर्तव्यावर असणारा पोलीस कर्मचारी लॉकअपची पाहणी करण्यासाठी गेला असताना त्याने गळफास घेतल्याची दिसून आले.
रात्री पांगरण्यासाठी दिलेल्या चादरीची काठ फाडून शिवाजी गरड याने गळफास घेतला. दरम्यान पोलीस लॉकअपमध्ये आरोपीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.