महिलेचा विनयभंग केलेल्या आरोपींना दोन वर्षे कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:10 AM2021-02-14T04:10:56+5:302021-02-14T04:10:56+5:30
प्रतीक चंद्रकांत शेरकर (वय २५) आणि अजय बाळासाहेब कंगले (वय ३२, रा. माळीवाडा, जुन्नर) यांना २ वर्षे कारावास ...
प्रतीक चंद्रकांत शेरकर (वय २५) आणि अजय बाळासाहेब कंगले (वय ३२, रा. माळीवाडा, जुन्नर) यांना २ वर्षे कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील पूजा नामक महिला पतिसमवेत रिक्षाने चाकण ते नारायणगाव असा प्रवास करीत होते. फिर्यादीचे पती रिक्षा चालवत होते. नारायणगाव-आर्वी फाटा येथे रिक्षा आलेवर यातील आरोपी प्रतीक चंद्रकांत शेरकर व अजय बाळासाहेब कंगले यांनी स्कूटीने रिक्षाला ओव्हरटेक करून फिर्यादी पूजा यांना हातवारे करून त्याचे पायाला आरोपीने पाय लावून छेडछाड केली केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुन्नर न्यायालयाचे न्या. व्ही. आय. घोरपडे यांनी साक्षी, पुरावे ग्राह्य धरून शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक व्ही. व्ही. जांभळे यांनी केला होता. त्यांना कोर्ट महिला पोलीस नाईक एस. डी. शितोळे यांना सहकार्य केले. सरकारी वकील ए. एस. वर्पे यांनी फिर्यादीचे वतीने बाजू मांडली.