कामगाराच्या खूनप्रकरणातील आरोपीस अटक व कोठडी

By admin | Published: May 31, 2017 01:37 AM2017-05-31T01:37:49+5:302017-05-31T01:37:49+5:30

येथील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या बहुमजली इमारतीच्या बांधकाम साईटवरील लेबर कँपमधील खोलीसमोर

The accused in the murder of a worker was arrested and detained | कामगाराच्या खूनप्रकरणातील आरोपीस अटक व कोठडी

कामगाराच्या खूनप्रकरणातील आरोपीस अटक व कोठडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : येथील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या बहुमजली इमारतीच्या बांधकाम साईटवरील लेबर कँपमधील खोलीसमोर शिवकुमार साहू या परप्रांतीय कामगाराचा दगडाच्या सहाय्याने खून करणाऱ्या त्याचा गाववाला अशोक भागबली यादव यास त्याचे मूळ गाव (मारो, ता. मारो, जि. बेमेतरा, राज्य छत्तीसगड) येथे जेरबंद करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले असून न्यायालयाने त्याला १ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील खोलेवस्तीसमोरील गट क्रमांक ३५६ मधील फोर अ‍ॅव्हेन्यू या सदनिकेच्या बांधकाम साईटवर हा प्रकार २२ मे रोजी पहाटे घडला होता. यामध्ये शिवकुमार धनाराम साहू (वय ४१) याचा खून झाला होता. घटना घडल्यापासून त्याचा साथीदार अशोक भागबली यादव (वय २८, दोघे रा. मारो, ता. मारो, जि. बेमेतरा, राज्य छत्तीसगड) घटना घडल्यापासून फरार होता.
मृत शिवकुमार साहू व त्यांचा गाववाला अशोक यादव दोघे गेल्या दोन महिन्यांपासून फोर अ‍ॅव्हेन्यू या सदनिकेतील सी व डी बिल्डिंगच्या बांधकामाच्या वॉटरप्रुफिंगचे काम करीत होते. ते दोघेही त्याच बांधकाम साईटवर असलेल्या एका पत्र्याच्या खोलीमध्ये राहत होते. खुनाचा हा प्रकार सोमवारी (दि. २२) सकाळी ६-३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. पोलिसांनी लेबर कँपमधील इतर कामगारांकडे चौकशी केली असता त्यांना यादव व मृत साहू दोघे रविवारी (दि. २१) रात्री खोलीसमोर झोपले होते. परंतु त्या दोघांत रात्री कोणत्या तरी कारणांवरून भांडण झाले होते, अशी माहिती त्यांना समजली.
या ठिकाणची परिस्थिती पाहता अशोक यादव यानेच रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तेथे पडलेल्या दगडांनी शिवकुमार साहू याच्या डोक्यात मारहाण करून त्यास जखमी करून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
पोलिसांनी व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अशोक यादव याचा हिंजवडी, रावेत, चांदणी चौक, हंडेवाडी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सदनिका उभारण्याची कामे चालू आहेत. त्या ठिकाणी शोधमोहीम राबविली होती.

Web Title: The accused in the murder of a worker was arrested and detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.