खंडणीमधील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:11 AM2021-03-25T04:11:46+5:302021-03-25T04:11:46+5:30
नसरापूर : येथील महिला व्यापारी व त्यांच्या मुलाला धमकावून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात ...
नसरापूर : येथील महिला व्यापारी व त्यांच्या मुलाला धमकावून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास राजगड पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणीमधील गजानन जीवराज कदम (वय ३२, रा. नसरापूर, ता. भोर, जि. पुणे) याला नसरापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळा येथे ताब्यात घेण्यात आले.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पद्माकर घनवट व राजगड पोलीस ठाण्याचे पो. नि. संदीप घोरपडे यांनी त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आर्म ॲक्टनुसार नसरापूर येथील राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गजानन याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे स्वरूप पाहून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सदर गुन्ह्यात लक्ष घालून आरोपीला अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
या प्रकरणी महिला व्यापारी उज्ज्वला सतीश जंगम (वय ५४, रा. नसरापूर, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे. राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीनुसार राजगड पोलिसांनी गजानन जीवराज कदम (वय ३३), राहुल चंद्रकांत पवार (वय २८) व पंकज हरिश रावत (वय २७, तिघेही रा. नसरापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा गुन्हे शाखेच्या मदतीने रात्री उशिरा गजानन कदम यास अटक केली असून इतर दोघांचा तपास सुरू आहे.
नसरापूरमधील जमीन गट नं. ३१२ च्या मोबदल्यात आम्हाला दहा लाख रुपये द्या, अशी धमकी देत जंगम यांना दहा लाखाच्या खंडणीची मागणी केली होती. यातील आरोपी कदम व पवार यांनी प्रत्येकी ५० हजार रुपये जंगम यांच्या कडून स्वीकारले असल्याची माहिती पो. नि. संदीप घोरपडेयांनी दिली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख, पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अमोल गोरे, पोसई निखिल मगदूम, पोना सागर चंद्रशेखर,पोशी अमोल शेडगे, पोशी मंगेश भगत, पोशी अक्षय नवले, पो. ना. संतोष दावलकर यांनी केली.