माैजमजेसाठी त्यांनी चाेरल्या 9 दुचाकी ; पाेलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 07:10 PM2019-08-21T19:10:59+5:302019-08-21T19:15:16+5:30
माैज मजेसाठी गाड्या चाेरणाऱ्या आराेपींना पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत.
पुणे : माैज मजेसाठी पुण्यातील विविध ठिकाणांहून दुचाकी चाेरणाऱ्या चाेरट्यांना भारती विद्यापीठ पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शंभु राजेंद्र खवळे (वय 20, रा. हडपसर), निलेश मिटु कदम (वय 19, रा. थेऊर), भानुदास धाेत्रे ( वय 40, रा. खंडाळा, जि. सातारा), सुनिल जाधव ( रा. वेल्हा) यांना अटक करण्यात आली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाेन इसम चाेरीची स्पेंडर घेऊन दुचाकी कात्रज तळ्याच्या जवळ फिरत आहेत. त्यांच्या दुचाकीच्या नंबरप्लेटवर चिखल उडाला आहे. त्यांच्याजवळची दुचाकी ही चाेरीची असल्याची माहिती पाेलीस कर्मचारी गणेश चिंचकर व अभिजीत जाधव यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्या ठिकाणी जाऊन पाेलिसांनी पाहणी केल्यावर दाेन इसम शेलार मळ्याकडून कात्रज तळ्याकडे येत असल्याचे पाेलिसांना दिसले. त्यांना पाेलिसांनी शिताफीने पकडले. आराेपींना तुमच्या दुचाकीच्या नंबरप्लेटवर चिखल का लावला अशी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पाेलिसांनी आराेपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आराेपींकडून भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून स्प्लेंडर, ड्रिम युगा, पल्सर, यमाहा, शिवाजीनगर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून पॅशन प्राे, लाेणी काळभाेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून अॅक्सेस, हाेंडा शाईन, यवत पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून सीबी शाईन अशा चाेरलेल्या एकूण 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी त्यांनी माैजमजेसाठी चाेरल्या हाेत्या. त्यांच्याकडून आराेपी भानुदास धाेत्रे आणि सुनिल जाधव यांच्याबाबतची माहिती मिळाली. त्यांच्याकडून पॅशन प्राे ही दुचाकी जप्त करण्यात आली.
याप्रकरणी अधिक तपास पाेलीस उप निरीक्षक सुवराव लाड करत आहेत.