बारामती पोलिसांचं 'कॉम्बिंग ऑपरेशन';खुनाच्या गुन्हयातील आरोपीला बनावट पिस्तूलसह अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 06:40 PM2021-07-08T18:40:55+5:302021-07-08T18:42:22+5:30
बारामती परिसरामध्ये माळेगाव बु (ता. बारामती) येथे गोळीबाराची घटना घडली होती.
सांगवी : कॉम्बिंग ऑपरेशन व रेकार्डवरील आरोपी यांची तपास मोहीम दरम्यान खुनाच्या गुन्हयातील आरोपीकडे गावठी बनावटीचे व दोन जिवंत काडतुसे मिळून आली असता त्याला बारामती तालुका पोलिसांनीअटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी बारामती परिसरामध्ये माळेगाव बु (ता. बारामती) येथे गोळीबार केल्याची घटना घडल्याने बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी बारामती परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी करून रेकॉर्डवरील आरोपींचा तपास मोहीम आखण्यात आली होती.
याबाबत बारामती तालुका गुन्हे शोध पथकाला सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार गुन्हे पथकातील अंमलदार बारामती तालुका पोलीस हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन, रेकार्डवरील आरोपी यांची तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. दरम्यान गुप्त माहितीदारामार्फत खुनाच्या गुन्हयातील जामिनावर असणारा आरोपी शुभम विकास राजापुरे हा येरवडा कारागृहातून पॅरोल रजेवर बाहेर आलेला आहे. सध्या त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असून असुन तो कमरेला लावून फिरत असतो अशी खात्रीलायक बातमी मिळाली होती. शुभम राजापुरे हा तांदुळवाडीमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच तिथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चौकशी दरम्यान एक गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन व दोन जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. शस्त्र परवाना नसल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश ढवाण,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे,राहुल पांढरे, नंदू जाधव,विजय वाघमोडे,विनोद लोखंडे,रणजित मुळीक यांनी केली.