रुबी हॉस्पिटलची वैशालीवर उपचार करण्यास टाळाटाळ, यादव कुटुंबाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 03:31 IST2017-10-17T03:31:27+5:302017-10-17T03:31:48+5:30
रुबी हॉस्पिटलच्या वतीने एक वर्षापूर्वीच सहा वर्षांच्या वैशाली यादवच्या हृदयरोगावर मोफत उपचार करण्याचे व उच्च शिक्षणापर्यंतची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे जाहीर घोषणा केली.

रुबी हॉस्पिटलची वैशालीवर उपचार करण्यास टाळाटाळ, यादव कुटुंबाचा आरोप
पुणे : रुबी हॉस्पिटलच्या वतीने एक वर्षापूर्वीच सहा वर्षांच्या वैशाली यादवच्या हृदयरोगावर मोफत उपचार करण्याचे व उच्च शिक्षणापर्यंतची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे जाहीर घोषणा केली. परंतु यादव कुटुंबीयांना दिलेल्या आश्वासनाचा रुबी हॉस्पिटलला एक वर्षातच विसर पडला आहे. पुढील उपचारासाठी रुबी हॉस्पिटलकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप तिचे वडील मोहनीश यादव आणि काका प्रताप यादव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
आर्थिक परिस्थिती हलाखीची. वैशालीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पत्राद्वारे संवाद साधला होता. पंतप्रधानांच्या पुढाकाराने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये २०१६ मध्ये वैशालीवर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली. हॉस्पिटलचे प्रमुख विश्वस्त डॉ. परवेझ ग्रॅँट यांनी व वैशालीच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान मोदी पुण्यात आले असता, तिच्या उच्च शिक्षणापर्यंत तसेच पुढील सर्व उपचाराचा खर्चही रुग्णालयातर्फे करण्यात येईल, असे सांगितले होते, असे वैशालीचे काका प्रताप यादव यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी वैशालीच्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्याने १२ आॅक्टोबर रोजी तपासणी करण्यासाठी हॉस्पिटल येथे घेऊन गेले. दुसºया दिवशी वैशालीवर शस्त्रक्रिया करणाºया डॉ. श्रीनिवास किणी यांच्या ओपीडीमध्ये तपासणीसाठी जात असताना त्यांना ८०० रुपये भरण्यासाठी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार डॉ. किणी यांनी वैशालीवर शस्त्रक्रिया केली असून, हॉस्पिटलमध्ये लावलेला फोटो वैशालीचाच असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला सांगितले. डॉ. किणी यांना कर्मचाºयाने संबंधित माहिती दिली, मात्र पैसे दिल्याखेरीज त्यांना आतमध्ये सोडू नये, अशा सूचना त्या वेळी दिल्या. वैशालीवर सर्व उपचार मोफत करण्याचे मान्य केले असतानाही, हॉस्पिटलतर्फे पैसे मागण्यात आले. तसेच शाळेमध्ये दाखल होण्यासाठी लागणाºया तीन हजार रुपयांचे कोटेशन घेऊन सात ते आठ वेळा गेले असता, ते मंजूर करण्यासाठी टाळाटाळ केली, असे मोहनीश यादव यांनी सांगितले.
यादव कुटुंब योग्य
व्यक्तींना भेटले नाहीत
१रुबी हॉस्पिटल आजही वैशाली यादववर मोफत उपचार करण्यास तयार असून, आपल्या शब्दावर ठाम आहे. तसेच शैक्षणिक खर्च करण्यासदेखील तयार आहे. १२ आॅक्टोबर रोजी तपासणी करण्यासाठी वैशालीला तिच्या काका आणि वडिलांनी रुबी हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा योग्य व्यक्तींना भेटले नाही.
२त्यांनी थेट डॉ. परवेझ ग्रँट अथवा हॉस्पिटलच्या सामाजिक अधिकाºयांना भेटणे अपेक्षित होते. परंतु परस्पर डॉ. श्रीनिवास किणी यांच्या ओपीडीमध्ये तपासणीसाठी गेल्याने त्यांना पैसे भरण्यास सांगितले.
३यामध्ये हॉस्पिटलची काही चूक नसल्याचा खुलासा रुबी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आला आहे.