आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:14 AM2021-08-14T04:14:44+5:302021-08-14T04:14:44+5:30
शासनाने व सासवड नगरपालिकेने पवित्र भावनेने प्रतिष्ठानला जागा दिली आहे. त्या जागेचा वापरही त्याच पद्धतीने होईल, अशी ग्वाही कोलते ...
शासनाने व सासवड नगरपालिकेने पवित्र भावनेने प्रतिष्ठानला जागा दिली आहे. त्या जागेचा वापरही त्याच पद्धतीने होईल, अशी ग्वाही कोलते यांनी या वेळी दिली. स्वागताध्यक्ष डॉ. राजेश दळवी यांनी पुरंदर व सासवडचे ऐतिहासिक, धार्मिक सामाजिक महत्त्व व परंपरा सांगितली. आचार्य अत्रे यांच्या गावात त्यांच्या नावाने होणाऱ्या साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. उद्घाटक आमदार संजय जगताप यांनी आचार्य अत्रे सासवडचे आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्रात कुठेही गेले तरी आपण सासवडचे आहेत, हे सांगताच लोक आचार्य अत्रे व क-हेचे पाणी याची आठवण काढतात. आचार्य अत्रे यांनी आपल्या लेखनातून सामान्य माणसाच्या मनातील भावना मांडल्या. त्याचे लिखाणाच्या वाचनाने आजही ताजेतवाने वाटते. आचार्य अत्रे याच्या स्मृती जपण्याचे काम सासवडकर म्हणून आम्ही करू, असे आमदार जगताप यांनी सांगितले.
संमेलनाचे अध्यक्ष भा. ल. ठाणगे यांनी पुढील पिढीला आचार्य अत्रे कळले पाहिजेत यासाठी आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन होणे गरजेचे आहे, असे सांगितले. आचार्य अत्रे पुरोगामी किंवा प्रतिगामी नव्हते, तर ते वास्तववादी होते. राज्यकर्ता किंवा कोणी माणसाचा विचार चुकला तर कठोरपणे टीका करीत; परंतु त्या माणसाने चूक सुधारली तर त्याचे कौतुकही मोठ्या प्रमाणात करीत. आचार्य अत्रे याची माणूस म्हणून ओळख होणे गरजेचे आहे. आजच्या साहित्यिकांना प्रेरणा देणारे म्हणून आचार्य अत्रे याची ओळख आहे, असे प्रतिपादन ठाणगे यांनी केले. माजी आमदार अशोक टेकवडे यांनी शुभेच्छा दिल्या. साहित्य परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब खाडे यांनी आभार मानले. सचिन घोलप यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण, विश्वस्त शशिकला कोलते, गौरव कोलते, नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे, हेमंत भोंगळे, कलाताई फडतरे, डॉ. जगदीश शेवते, सौ. दळवी, दिलीप निरगुडे, शिवाजी कोलते, दशरथ यादव, वसंतराव ताकवले, शिवाजी घोगरे, रामदास जगताप, बिभीषण जाधव, जालिंदर जगताप इ. उपस्थित होते. शांताराम कोलते, अनिकेत जगताप, राहुल जाधव, दादा मुळीक, शहाजी पवार यांनी नियोजन केले.
सासवड येथे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना आमदार संजय जगताप, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते व मान्यवर.
130821\img-20210813-wa0076 (4)-1.jpg
सासवड येथे आचार्य अत्रे साहीत्य संमेलनांचे ऊद्घाघाटन करताना मान्यवर