आचार्य अत्रे प्रतिष्ठानकडून जेजूरी भाविकांसाठी सुविधा केंद्र सुरु करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:10 AM2021-01-02T04:10:04+5:302021-01-02T04:10:04+5:30
-- सासवड : आचार्य अत्रे प्रतिष्ठान संस्थेच्या जेजुरी येथील महाविद्यालयात भाविकांसाठी सुविधा केंद्र, सासवड येथे इंग्रजी माध्यमाची शाळा, जेजुरी ...
--
सासवड : आचार्य अत्रे प्रतिष्ठान संस्थेच्या जेजुरी येथील महाविद्यालयात भाविकांसाठी सुविधा केंद्र, सासवड येथे इंग्रजी माध्यमाची शाळा, जेजुरी येथे फार्मसी महाविद्यालय, सासवड येथे दुकान केंद्र असे उपक्रम नवीन वर्षात हाती घेतले आहेत ते यंदा पूर्णत्वास जातील असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी केले.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान गेली ३४ वर्ष शिक्षण, साहित्य, वाचनालय, साहित्य संमेलन अशा माध्यमातून समाजात कार्य करीत आहे. ३५ वर्धापनदिना निमित्त नवीन संकल्प करण्यात येत आहेत माहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते दिली. प्रतिष्ठानचा ३५ सावा वर्धापनदिन सासवड येथील सभागृहात साजरा करणेत आला त्यावेळी अध्यक्षस्थानावरून कोलते बोलत होते.
यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब खाडे, कार्याध्यक्ष खाजाभाई बागवान, नियमकमंडळाच्या सदस्या माई कोलते, ॲड. कला फडतरे, सहसचिव बंडूकाका जगताप, गौरव कोलते, गुरोळी स्कुलकमीटीचे अध्यक्ष रामचंद्र खेडेकर, कुंडलिक मेमाणे, बाळासाहेब दाभाडे, मुख्याध्यापक शिवाजी घोगरे, रामदास जगताप, जालिंदर जगताप, बिभीषण जाधव, प्राचार्य धनाजी नागणे उपस्थित होते. सचिन घोलप यांनी स्वागत केले. सचिन धनवट यांनी सूत्रसंचालन केले
--
०१ आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान
फोटो ओळी :आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर च्या वर्धापन दिनानिमित्त गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, माजी आमदार अशोक टेकवडे, खाजाभाई बागवान, कुंडलिक मेमाणे व मान्यवर