आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान नवीन उपक्रम हाती घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:10+5:302021-01-04T04:10:10+5:30

प्रतिष्ठानचा ३५वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून कोलते बोलत होते. माजी आमदार अशोक टेकवडे प्रमुख ...

Acharya Atre Vikas Pratishthan will undertake new ventures | आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान नवीन उपक्रम हाती घेणार

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान नवीन उपक्रम हाती घेणार

Next

प्रतिष्ठानचा ३५वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून कोलते बोलत होते. माजी आमदार अशोक टेकवडे प्रमुख पाहुणे होते. ज्येष्ठ नेते शरद पवार हे या संस्थेचे २३ वर्षे अध्यक्ष होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज सुरू आहे, संस्थेच्या जेजुरी येथील महाविद्यालयात भाविकांसाठी सुविधा केंद्र, सासवड येथे इंग्रजी माध्यमाची शाळा, जेजुरी येथे फार्मसी महाविद्यालय, सासवड येथे दुकान केंद्र असे उपक्रम नवीन वर्षात हाती घेतले आहेत. आचार्य अत्रे प्रतिष्ठान सर्वांना आपले वाटावे, अशी भावना माजी आमदार अशोक टेकवडे यांनी व्यक्त केली. प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली. प्रतिष्ठानच्या वतीने संचलित विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करणेत आला. कार्यक्रमास साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब खाडे,कार्याध्यक्ष खाजाभाई बागवान, नियामक मंडळाच्या सदस्या माई कोलते, कला फडतरे, बंडूकाका जगताप, गौरव कोलते, रामचंद्र खेडेकर कुंडलिक मेमाणे, बाळासाहेब दाभाडे, मुख्याध्यापक शिवाजी घोगरे, रामदास जगताप,जालिंदर जगताप,बिभीषण जाधव ,प्राचार्य धनाजी नागणे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सचिन घोलप यांनी स्वागत केले. सचिन धनवट यांनी सूत्रसंचालन केले.

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरच्या वर्धापन दिनानिमित्त गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, माजी आमदार अशोक टेकवडे, खाजाभाई बागवान ,कुंडलिक मेमाणे व मान्यवर.

Web Title: Acharya Atre Vikas Pratishthan will undertake new ventures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.