आचार्य अत्रे अफाट, अचाट, अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व होते : प्रा शालिनी पटवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:10 AM2021-02-24T04:10:22+5:302021-02-24T04:10:22+5:30
सायली पटवर्धन यांनी सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या आचार्य अत्रे कलादालनास भेट दिली. त्या वेळी त्या बोलत होत्या. ...
सायली पटवर्धन यांनी सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या आचार्य अत्रे कलादालनास भेट दिली. त्या वेळी त्या बोलत होत्या. प्रा. पटवर्धन मध्यप्रदेशातील विद्यापीठात मराठी विषयाच्या विभागप्रमुख होत्या. निवृत्त झाल्यावर त्यांना आचार्य अत्रे यांचे गाव पाहाण्याची इच्छा होती. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी सासवडला भेट दिली व आचार्य अत्रे यांचे गाव, कऱ्हा नदी, आचार्य अत्रे यांचे जन्मठिकाण आदी स्थळांना भेटी दिल्या. आचार्य अत्रे कलादालनला सचिन लिमये यांनी काढलेल्या आचार्य अत्रे यांचे व्यक्तिचित्र भेट दिले. आचार्य अत्रे यांची स्मृती जपण्याचे काम सुरू राहावे, यासाठी समीर पराडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५० हजार रुपयांची देणगी दिली. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी स्वागत केले. आचार्य अत्रे यांचे आम्ही प्रेमी आहोत. त्याच्या स्मृती जपण्याचे काम करीत आहोत, असे कोलते यांनी या वेळी सांगितले. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब खाडे, कार्याध्यक्ष खाजाभाई बागवान, उपाध्यक्ष बंडूकाका जगताप, डॉ. राजेश दळवी, शशिकला कोलते, सचिव शांताराम पोमण उपस्थित होते.
फोटो : सासवड येथील आचार्य अत्रे कलादालनास आचार्य अत्रे यांचे व्यक्तिचित्र भेट देताना प्रा. सायली पटवर्धन, कलाकार सचिन लिमये व इतर.