अल्पवयीन अट्टल गुन्हेगारीच्या वाटेवर

By admin | Published: May 21, 2017 03:55 AM2017-05-21T03:55:52+5:302017-05-21T03:55:52+5:30

वाहनचोरी, मोबाईलचोरी अथवा घरफोडी अशा गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगारांबरोबर अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून येतो. शाळेत शिकण्याच्या वयात ही मुले

In achchmars acchcrac acchchau © considerchick Inchchuberchuber In Inchchuberchauchchaptesch In a Well Being In Inh | अल्पवयीन अट्टल गुन्हेगारीच्या वाटेवर

अल्पवयीन अट्टल गुन्हेगारीच्या वाटेवर

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : वाहनचोरी, मोबाईलचोरी अथवा घरफोडी अशा गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगारांबरोबर अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून येतो. शाळेत शिकण्याच्या वयात ही मुले गुन्हेगारी कृत्यात सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी अर्धवट शिक्षण सोडावे लागलेली मुले हॉटेलात, गॅरेजमध्ये काम करताना दिसून येतात़ अलीकडे असे काम करण्याकडे मुलांचा कल दिसून येत नाही. चोरी, घरफोडी हा मौजमजेसाठी पैसे मिळविण्याचा शॉटकर्ट मार्ग त्यांनी अवलंबला आहे. स्थानिक गुडांना आदर्श मानून त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारी ही मुले अट्टल गुन्हेगारीच्या वाटेवर आहेत. याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी घटनांमध्ये सहभाग वाढतो आहे. चिंचवड पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत दुचाकी व मोबाईल पळविणारे आठ आरोपी पकडले. त्यातील पाच आरोपी अल्पवयीन होते.
तत्पूर्वी पिंपरी, भोसरी आणि अन्य परिसरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून आला आहे. केवळ चोरीच्या गुन्ह्यातच नाही तर खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातही अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्याचे निदर्शनास आले आहे. अर्धवट शिक्षण, हाताला काम नाही त्यामुळे लहान मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत.

स्थानिक गुंड आदर्श
स्थानिक गुंड हे आपले आदर्श मानून त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा काही मुले प्रयत्न करीत आहेत. गुंडाचे वाढदिवस साजरे करण्यात अशा मुलांचा पुढाकार दिसून येऊ लागला आहे. पिंपरी, विठ्ठलनगर, नेहरूनगर, अजंठानगर, भोसरी, निगडी, चिंचवड या भागांत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या अल्पवयीन मुलांनी त्यांच्या भागात वेगवेगळ्या नावाने ग्रुप तयार केले आहेत. हे ग्रुपच भविष्यात गुंडांच्या टोळ्यांमध्ये रूपांतर होतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

- शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग अधिक असल्याचे विविध घटनांच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे. दुचाकी तसेच मोबाईल चोरट्यांची टोळी जेव्हा पकडली जाते, त्या वेळी त्यात निश्चितपणे काही आरोपी अल्पवयीन असतात.

Web Title: In achchmars acchcrac acchchau © considerchick Inchchuberchuber In Inchchuberchauchchaptesch In a Well Being In Inh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.