आळंदीतील विद्यार्थ्यावर रोममध्ये झाला ऍसिडहल्ला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 05:42 PM2019-06-28T17:42:00+5:302019-06-28T19:00:21+5:30

कुठ्ल्यावेळी काय वेळ येईल हे सांगता येत नाही. पण अशा परिस्थितीतही जो धैर्याने मार्ग काढतो तो खरा माणूस. ही गोष्ट आहे आळंदीत शिकणाऱ्या हर्षित अग्रवालची.

Acid attacked on MIT Alandi student in Rome | आळंदीतील विद्यार्थ्यावर रोममध्ये झाला ऍसिडहल्ला आणि...

आळंदीतील विद्यार्थ्यावर रोममध्ये झाला ऍसिडहल्ला आणि...

Next

पुणे : कुठ्ल्यावेळी काय वेळ येईल हे सांगता येत नाही. पण अशा परिस्थितीतही जो धैर्याने मार्ग काढतो तो खरा माणूस. ही गोष्ट आहे आळंदीत शिकणाऱ्या हर्षित अग्रवालची. रोममध्ये प्रबंध सादर केलेल्या हर्षितवर तिथे ऍसिड हल्ल्यासारखे गंभीर संकट ओढवले. मात्र त्यातूनही मार्ग काढत त्याने भारतीय दूतावासाची मदत मिळवली. लवकरच ती भारतात परतणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,हर्षित मूळ मध्य प्रदेशमधील रानपूरचा रहिवासी आहे. तो पुण्याजवळील आळंदी येथील एमआयटीमध्ये संगणकशास्त्राचे शिक्षण घेतो. तो त्याच विषयातील प्रबंध सादर करण्यासाठी गेला होता. प्रबंध सादर करून बुधवारी परतणार असताना विमानतळावर जाण्यासाठी त्याने टेस्कोलाना मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश केला. मात्र तिथे सहा चोरांनी मिळून त्याच्यावर ऍसिड हल्ला केला. त्यांना त्याच्या लॅपटॉपबॅगला लक्ष करायचे होते मात्र त्याने बॅग न सोडल्याने पुन्हा त्याच्यावर हल्ला झाला आणि अखेर चोर ती बॅग नेण्यात यशस्वी झाले.

त्याच बॅगेत त्याचा पासपोर्ट, पैसे आणि इतर कागदपत्र होते.मात्र मोबाईल खिशात असल्यामुळे तो बचावला. त्यांनतर त्याने न घाबरता घरी फोन करून सर्व प्रकार सांगितला. प्रसंगावधान राखून जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रारही नोंफवली. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे भारताच्या राष्ट्रपती, परराष्ट्रमंत्री, पंतप्रधान यांना मदतीचे ट्विट केले. त्याच्या ट्विटची दखल घेत काही तासातच त्याला मदत करण्यास प्रशासन पुढे आले. सध्या तो सुरक्षित असून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्याच्याशी व्यक्तिशः संवादही साधला आहे. पुढील दोन दिवसात कागदपत्रांची पूर्तता करून तो भारतात परतेन. या संदर्भात त्याने फेसबुकच्या माध्यमातून भारतीय प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Web Title: Acid attacked on MIT Alandi student in Rome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.